दीप लावू मनोमनी
दीप लावू मनोमनी
मनातली जळमटे
दूर करु धूळ जाळी
टाकू काढून सत्वरी
सज्ज स्वागता दिवाळी (१)
प्रभू असे कृपावंत
धन धान्य अगणित
देऊ गरजू जनांस
हर्षभारे प्रमुदित (२)
ज्योत सदविचारांची
लावू प्रत्येक अंतरी
तेजोमय प्रकाशाने
उजळेल धरा सारी (३)
नववस्त्र दान करु
प्रेमे फराळही देऊ
मन विशाल करुनी
दीपोत्सव उजळवू (४)