STORYMIRROR

Vishweshwar Kabade

Abstract

3  

Vishweshwar Kabade

Abstract

व्यसन

व्यसन

1 min
309

नको जाऊ तू व्यसनाच्या आहारी

फिर लगेच अशा मैफिलीतून तू माघारी ||धृ||


आई-वडिलांनी केलंं तुझ्या रात्रंदिनी कष्ट

नको करू तू त्यांंना म्हातारपणी नष्ट

जरी राहिलास तू एकटा

तरी जीवनात शोधत रहा नवीन छंदाच्या वाटा

नको जाऊ तू व्यसनाच्या आहारी

फिर लगेच अशा मैफिलीतून तू माघारी||१||


बाळग चांगली संगत

बसव चांगली पंगत

नको घेऊ जीवनात ताण

ठेव आई-वडिलांचा मान

नको जाऊ तू व्यसनाच्या आहारी

फिर लगेच अशा मैफिलीतून तू माघारी||२||


व्यसनातूनी आतापर्यंत झाला कोणी मोठा?

विचार आपल्या मनाला हा प्रश्न छोटा 

व्यसनातूनी तुला भेटेल तात्कालिक

सुख

संपूर्ण कुटुंबाला भेटेल दुःख

नको जाऊ तू व्यसनाच्या आहारी

फिर लगेच अशा मैफिलीतून तू माघारी||३||


कर अशा व्यसनाधीन माणसांची तू कट्टी

नकोस करू त्यांच्या नादानं व्यसनातून

उधळपट्टी

जीवन आहे खुप सुंदर

पैसा जमव वरचेवर

नको जाऊ तू व्यसनाच्या आहारी

फिर लगेच अशा मैफिलीतून तू माघारी||४||


नाही इथे कोणी कोणाचा

प्रत्येकालाच नाद लागलाय फक्त पैशाचा

घेे आता तू हे जाणूनी

नको जाऊ कधीही व्यसनातूनी 

नको जाऊ तू व्यसनाच्या आहारी

फिर लगेच अशा मैफिलीतून तू माघारी||५||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract