फास
फास
काय होता तिचा गुन्हा
तिनं केलं होतं प्रेम पुन्हा
लावला होता तिनं नेम
चुलत आत्याच्या पोरासोबत केलं प्रेम
दोघेही घरातून गेले निघून
वापस आणलं त्यांना घरच्यांनी लग्न लावून देतो म्हणून
आधी होता होकार
वाटाघाटीत ऐन लग्नमंडपात मिळाला नकार
लहानपणी ज्यांनी भरवला घास
त्या बाप व काकांनी लावला तिला फास
त्यांनीच रचला तिच्यासाठी सरण
घडून आणलं एक नाट्यमय मरण
नाही कुणा आला तिचा कीव
नाहक गेला तरण्या पोरीचा जीव
