धर्मा तुझा रंग कसा ?
धर्मा तुझा रंग कसा ?
असा कसा?
धर्मा तुझा रंग कसा ?
हरवून गेलं भान
तुझ्या रंगाने लागायलंय धार्मिक भांडण
तुझ्या रंगानेच कुणाच्या जागा व्हायल्या संवेदना
तुझ्या रंगानेच कुणाच्या दु:खायल्या भावना
कोण उकरून काढतोय वाद
करूनी या भारताला बरबाद
निसर्गाची सुंदर निर्मिती ही रंग
स्वार्थी मानवांनी केलं तिला बेरंग
प्रत्येक रंगाची स्वतःची एक परिभाषा
चित्रकारालाच समजते ती भाषा
तहानभूक हरवून तो चित्र रंगवतो
तुम्ही-आम्ही मूर्ख त्यात धार्मिकतेचा रंग पहातो
एकमेका मदत करण्यात राहू या दंग
येथे प्रत्येकाच्याच रक्ताचा लालभडक रंग
