सरण
सरण
पहा सख्ख्या पोरांचा प्रताप
सरणावरती एकटाच जळत होता बाप
जीवंतपणी होतं त्यांचं त्याच्याशी वैर
मेल्यानंतरही केलं त्यांनी त्याला गैर
विसरले ते आपले संस्कार
नाही केला त्याचा अंतिमसंस्कार
स्वतः भोगतात गृहस्थाश्रम
बापाला मात्र दाखवलं होतं वृद्धाश्रम
राब राब तो राबला
शेवटी सुखाचा घास त्याला नाय भेटला
त्याच्या हाताला येत होते कष्टाचे फोड
म्हणूनी तर त्याच्या पोरांचे आजचे दिवस गोड
घोर हे कलियुग
पैशासाठीच चलतंय हे युग
खरंच या जगात कोणी कोणाचं नसतं
म्हणून तर रक्ताचं नातंदेखील येथे फसतं
