पुन्हा एक निर्भया...
पुन्हा एक निर्भया...

1 min

343
दोष नव्हता तिचा,
ति फसली गेली होती....
स्वतःचा प्राण सोडून ती,
वृत्तपत्रांची बातमी बनली होती....
घाबरली असेल ना हो ती,
मदतीसाठी धावली असेलच ना ती....
कितीही करून शेवटी नराधमांच्या,
कचाट्यात अडकलीच ना हो ती....
सहन केलं तिनं,
प्रचंड वेदना अन अत्याचार....
माणसांच्या रूपातील राक्षसांमुळं,
झाला तिचा बलात्कार....
आज ,उद्या अजून कोण बळी ठरेल,
हे सगळं जेव्हा थांबेल....
तेव्हा तीच खरी
तिची श्रद्धांजली असेल....
नराधम मारले गेले तेव्हा,
ती किंचितशी सुखावलीही असेल....
पण निर्भया,आसिफानंतर,
तिचंदेखील नाव पिडीता म्हणूनच निघेल....
दाखल होतात गुन्हे,पण
कधी येईल कडक कारवाईचा कायदा....
जिथं सीताच सुरक्षित नाहींत,
तिथं राम-मंदिर बांधून तरी काय फायदा...