STORYMIRROR

TEJASWI MOHITE

Tragedy

3  

TEJASWI MOHITE

Tragedy

मरणयातना..!!

मरणयातना..!!

1 min
246

माझ्या शरीरातून 

आज आत्म्याने साथ सोडली

त्याच वेळी लोकांनी

माझी तिरडी बांधायला घेतली..


शेवटची अंघोळ घातली मला

पण त्यात कसलाच जिव्हाळा नव्हता

फोडलेला टाहो आणि प्रत्येक हुंदका

मी मेल्याची वार्ता पसरवत होता..


चार खांदयांवरती

माझं शरीर नेण्यात आलं

स्मशानात गेल्यावर

पार्थिव चितेवर ठेवण्यात आलं...


"नेऊ नका तिला" असं म्हणतं

कोणीतरी आडवं पडलं

जिवंतवणी का नसेना पण

मेल्यावर साऱ्यांना माझ्यावर प्रेम जडलं..


मी जळत होते

पण त्रास इतरांना होत होता

आज माझा वैरीसुद्धा

माझ्यासाठी रडत होता..


ना कुणी जवळचं, ना कुणी परकं

माझ्यासाठी सारे एक झाले

कवटी माझी फुटतां ,

सारं स्मशान मोकळं करून गेले..


धगधगत्या आगीत झोपुनही

मला आज शांत वाटतं होतं

ओरडून काय करणार???

आज मला जीव लावणाऱ्यांनी जाळलं होतं..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy