पोशिंदा
पोशिंदा


त्याने नुसतं अंग टेकल..पापण्या मिटवल्या
आणि क्षणात निद्राधीन झालासुद्धा...
कुणाचातरी बाप..कुणाचा दादला..कुणाचा आजोबा...
आज भर पावसात..एवढ्याश्या तंबूत तळ ठोकून झोपी गेलेला पाहिला...
त्याची झोप कष्टाची..समाधानाची..
अशी झोप कुठली गोळी तरी खाऊन मिळेल काय हो..??
तडजोड तर नशिबाला लागली की त्याच्या तरी कसलीच तक्रार नाही...
एवढं तेवढं आपल्याला खुपतं...म्हणून झुरुन मरणं आपल्या नशिबी...
झिजून मरावं तर त्यांच्यासारख..शिकावं त्यांच्याकडूनचं..
हातातून निसटलेल्या मातीसाठी हळहळ करत बसण्यापेक्षा
नवी मूठ भरण्यासाठी सज्ज व्हायचं असतं...!!