आई मला वाचव
आई मला वाचव
आई मला वाचव..
हे ती म्हणत होती
नराधमाच्या तावडीतुन सोडव
हदयापासून ओरडत होती ॥॥
रस्यावरून येता-जाता
नजरा त्या नराधमाच्या तिच्यावरती
कधी भेटेल ती एकटी
यांची वाट पाहात बसे ते कट्टयावरती ॥॥
तिला एकटीला गाठुन एकदा
लचके त्यांनी ओरबडले होते
रक्तांच्या थारोळ्यात सोडुन
नराधम ते पसार झाले होते ॥॥
तोड दाबून अत्याच्यार करतो
तो हैवान रस्त्यावरचा
तिला बघण्यासाठी जमलेला
सारा समाज हव्यासाचा ॥॥
तिला पाहण्यासाठी जमलेल्याच्या कानी
वेदनेची किंकाळी पोहोचली नव्हती
रस्त्यावरचा खेळ पाहणारी
ती ही गिधाडे फोटो घेण्यात रमली होती ॥॥