तुझ्या भेटीसाठी
तुझ्या भेटीसाठी
तुझ्या भेटीसाठी | वेढावला जीव ||
मन घेई धाव | पांडुरंगा ||
गैनीनाथ गुरू | निवृत्तीनाथांचे ||
सकल जणांचे | ज्ञानदेव ||
सोपानदेवांचे | रचितो अभंग ||
भारूडात दंग | एकनाथ ||
सावळ्या रूपाचे | विठू-रखुमाई ||
&n
bsp; हरपून जाई | जनाबाई ||
टेकवितो माथा | चॅद्रभागे तिरी ||
पहिल्या पायरी | नामदेव ||
पताका घेऊन | वारकरी चाले ||
भक्तीत दंगले | तुकाराम ||
तुझ्या भेटीसाठी | वेडावला जीव ||
मन घेई धाव | पांडुरंगा ||