देव माता-पिता
देव माता-पिता

1 min

142
सावळ्या रूपात । दिसतो लोचणी ।।
वसे भाव मनी । पांडूरंगा ।।
झालो तुझा दास । बाळगूनी ध्यास ।।
दिला तूच श्वास । जगी येता ।।
घडले दर्शन । पंढरीच्या नाथा ।।
असे माता-पिता । माझे देव ।।
अंलकापुरीत । भेटते माऊली ।।
सोबत सावली । चाले वारी ।।