गणरायांचा थाट
गणरायांचा थाट

1 min

349
गणराया तुम्ही येता
आनंद होई
तुम्हाला पाहता
मन भरून जाई ॥
थाटात तुम्ही
पाटावर बसता
सार्या विश्वावर
नजर ठेवताना दिसता ॥
संकटात असणार्याला
बाप्पा तुम्ही हेरता
विघ्न त्यांच्यावरील
दूर करताना दिसता ॥
बाप्पा तुमचे
चरण सर्वजण धरतात
तुम्ही मात्र सेवा करणार्याला
आशीर्वाद देताना दिसता ॥