वीर जवान
वीर जवान


तुझे नाव घेता उर पेटते
शहिद शब्द कानी येता मन दाटते
देशासाठी सतत तत्पर तु असे
नित्य कामे तु करताना दिसे
शञुला धडा शिकवण्यास पेटुन उठे
देशसेवेचे कार्य तुझे कर्तृत्त्व मोठे
देशासाठी तु बलिदान देई
शौर्य गाजवता जीवन सार्थक होई
मातृभुमीसाठी तु प्राण प्रणाने लढतो
शञुला नमवुन बाजी मारतो
वीर जवान तु लढवय्या असे
तिरंग्यातील देह स्फृर्ती देताना दिसे
लाखों जण तुझी प्रेरणा रे घेई
देश संरक्षणाला उभे ते होई