STORYMIRROR

Pallavi Sonagote

Tragedy Crime

3  

Pallavi Sonagote

Tragedy Crime

लढा !

लढा !

1 min
325

ये गं सखी, तुला सांगते ,

निराकार चेहऱ्याची कथा निराळी,

तुझ्यासारखेच होते ,

सुंदरतेचे गर्व मलाही,

पण् पाहता आज हा दर्पण,

कोसळते मन, थरथरते हे अंतःकरण,

अन् ,वाटते संपले आयुष्याचे हे प्रयोजन!


सुंदरतेचे होते लोभ त्याचे,

धैर्य मात्र खचले माझे,

म्हणे - प्रेम आहे तुझ्यावर ,

प्रेम का हे नुसते पोकळ,

जे न पचवले नकार!


करून हा जीवघेणा हल्ला,

मनाचा ताबा त्याने मिळवला,

शरीर - मन खचित झाले,

पगोपगी जनतेने बोलणे लावले!

चेहऱ्यावरचे नुर गेले,

कधी घाबरले मुल रस्त्यावरचे,

कधी घाबरणे झाले मलाच माझे!


आता कळले माझे मलाच ,

होऊन मनाने खंबीर ,

असार्थ त्याचे प्रयास केले,

दाखविले त्या विनाशकरास,

अपयश आले विकृत मनास!


ऐक गं सखी, डगमगू नको तूही,

लढून हा लढा , देऊया मात अचींतनाला,

करूया सुरुवात नव्या प्रवासाला !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy