जन्म कवयित्रीचा!
जन्म कवयित्रीचा!
मनात भिन्न विचार उमटले,
मग विचारांना अक्षरांत गुंफले,
अक्षरांना शब्दांत रंगवले,
पाहता पाहता यमकच जुळले,
नकळत मी कवयित्री बनले!
काव्य नवे हे जग कल्पनेतले,
आयुष्याचे सारच बदलले,
तंबीच्या पेटित आठवणी जपत,
भाषेचे अलंकारही जपले,
नकळत मी कवयित्री बनले!
झाली कविता सखी माझी,
सुरु झाला खेळ लपंडाव,
कधी ती आली एकांतात माझ्या
कधी मीच मारली हाक जोराची
ती रमली माझ्यात, मी तिच्यात रमले
नकळत मी कवयित्री बनले!
