STORYMIRROR

Pallavi Sonagote

Inspirational

3  

Pallavi Sonagote

Inspirational

कायापालट!

कायापालट!

1 min
536

जेव्हा शोधत होते मी माझ्यातले मीपण,

तेव्हा गावलीस अशी तू मला,

जसे मिळे सिंधूस हे गगन!

कळेना मलाही न कळे तुलाही,

प्रेम हे आहे सृष्टीत दुर्मिळ,

पण झाले कसे एका तरुणीला तरुणीस?


सुटलय माझच कोडं, कोणाला सांगावं तरी कसं?

हा नियम निराळा, नवा आहे तो जगाला,

जातच ज्यांचा धर्म, पाळत नाही जे मार्दव,

नियमविरोधी प्रेमाला मिळणार कसे समर्थन,

समजू न शकले जॆ स्त्री-पुरुष प्रेमाला,

काय समजतील तॆ समलिंगी विवाहाला?


झाले खूप हीर रांझा अन् लैला मजनू ही,

आता लिहू एक नवी प्रेमकथा,

एक होती राणी अन् दुसरीही होती राणी,

प्रेमाचा प्रवास होता निराळा,

आयुष्य संपले, पण संपली नाही ही गाथा!

आता करू साकार ही प्रेमवारी, 

अन् होईल कायापालट या समाज रचनेची!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational