Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pallavi Sonagote

Tragedy Crime

4.9  

Pallavi Sonagote

Tragedy Crime

मनोवृत्ती

मनोवृत्ती

1 min
291

भर दुपारी , झाडाखाली,

खेळत बसले , खेळ भातुकली!

पाहुनी मला, एक नराधम ,

साधून जवळीक, म्हणे - चल छकुली ,

खेळून बघ, आज हा खेळ नवीन!

इवलेशे मी, न कळली मला,

चाहूल त्या राक्षस मनाची!

भातक्याचं खूळ लावून,

केली अंगमनची लाही - लाही!

जगण्याची होती आकांक्षा,

स्वप्न पाहिले होते, उंच - भरारी!

भेटला, तो फक्त स्वाद ह्या मातीचा,

बापाचं कोसळनं, अन् आईची किंचाळी!

माझ्यासारखीच एक छकुली,

बसली पहा, तुमच्या अंगणी!

आला पुन्हा , तो नराधम,

केले तिच्याही आयुष्याचे पाणी - पाणी!

सांगा तुम्हीच आता , कितींचा बळी पाहते,

शरीरसुखाची ही, असली मनोवृत्ती?

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy