STORYMIRROR

Pallavi Sonagote

Romance

3  

Pallavi Sonagote

Romance

नको ना वाट अंताची

नको ना वाट अंताची

1 min
274

जेव्हा संपले होते विचार सारे,

अन् सोडली आस जगण्याची,

तेव्हा तू आलीस अशी,

अन् बद्दल्ली वाट आयुष्याची!


सुटले सारे कोडे,

अन् जगणे झाले सोपे,

जेव्हा साद घातलीस तू प्रेमाची!

आता लागलीय तुझी गोडी अशी ,

घालवेना एक क्षणही तुझ्याविना रे!!


सहवास झाला तुझा असा,

सारे दुःख हरून गेले!

आता जगण्याची ही आस नवी,

सोबत साथ तुझ्या प्रेमाची!

ओलांडावे जीवन- चरण संगतीने,

हेच काय ते आयुष्याचे सार!!


सोडू नको साथ कधी,

विसरू नको वाट कधी,

अन् शंकाही नको ठेवू मनी!

तुझा असहवास उजळेल, आता आयुष्य असे,

जसा मावळतो सूर्य, अमावस्येच्या रात्रीस!!!


आहे ग मी तुझाच ऋणी,

आयुष्य सार्थ माझे केलेस,

आता सोडून माझी साथ,

नको दाखवू अंताची वाट !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance