STORYMIRROR

Pallavi Sonagote

Romance Tragedy Others

3  

Pallavi Sonagote

Romance Tragedy Others

अपेक्षा नाही !

अपेक्षा नाही !

1 min
275

लक्ष रे माझे वेधले,

तुझ्या त्या एका हास्याने!

पाहून तुझी ती चंचल नजर,

नाही चित्त हे थाऱ्यावर!


नाही कळले रे मला,

कधी बसले या प्रेमाच्या नावेवर,

ठरले गाठायचा तीर तोच,

जो पोहोचवेल आता नावेला तुजवर!


उमलते जशी पालवी,

दवबिंदूच्या स्पर्शाने!

तसाच खुलतो चेहरा माझा,

तुझ्या एका झलकेने!


कळून चुकले मलाही,

तट नव्हे हा क्षितिजच,

गाठणे आहे कठीण!

असंच पाहून रोज तुला,

ध्यास माझा संपला!


आता अपेक्षा नाही,

या प्रेमाला माझ्या,

तुझा होकार कळावा!

प्रश्न असले कितीही,

तरी अपेक्षा नाही उत्तराची !


अपेक्षा नाही तुझ्या प्रेमाची!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance