त्यांना जावई करुनच घ्यावे
त्यांना जावई करुनच घ्यावे
(वर्ध्याच्या घटनेचा निषेध)
वर्ध्यातील घटनेसारखे हे धडे
अजून प्रशासनाला किती हवे
वाटते या नराधमांना भर चौकात
जनतेच्याच ताब्यात द्यायला हवे
चौकशी पुरावे वकील न्यायालय
यात प्रत्येकांनी वृत्ती ठेवायला हवी
या जागी आपली मुलगी बहीण
सद्ःविवेक बुद्धीनेच पाहायला हवी
असे खटले वर्षानूवर्षे चालवून
गुन्हेगार कमी होणार नाहीत कधी
हे विशेषत्वे सर्वांनी जाणून घेऊन
कठोर शिक्षा लवकरच द्यावी आधी
निर्भयाच्या गुन्हेगारांचे चाललेले
हे लाड मात्र इथे थांबायलाच हवे
ज्यांना त्यांचा अजूनही पुळका येतो
त्यांनी त्यांना जावई करुनच घ्यावे