#हार
#हार
मन हे माझे वेडे कसे
क्षणात हसे अन क्षणात रुसे.
पाशात अडकुनी संसाराच्या
मावळल्या आशा त्या स्वप्नांच्या.
उंच उंच मनोरे रचलेले
एक एक ढासळत राहिले.
तरीही ते कधी माने हार
दोन हात करण्या सदा तयार.
प्रा.सौ. नलिनी लावरे
