#उन्हाळा
#उन्हाळा
आला आला उन्हाळा
आता तब्येत सांभाळा
आंबट लागते कच्चे कैरी
थंड पन्हे लागतं भारी
चिंचा पाहून सुटते पाणी
चिंचगूळ मिळून करा चिंचवणी
पाणी पीत रहा भरपूर
सोबतीला लिंबू सरबत ग्लासभर
कलिंगड खाते उगाच भाव
समोर पुढे दिसताच मारा ताव
खरबूज बिचारे शांत बाजूला
थोडे घ्यावे त्याला चवीला
कैरीची डाळ घ्या ताटाला
रंगात येईल मग जेवणाला
प्रा.सौ. नलिनी लावरे
