#साथ
#साथ
रविकिरणे तांबूस पिवळी
ऊर्जेचे जणू आहे घर
स्वप्न सोनेरी शहाणपणाचे
भर देत असे ज्ञानावर
खजिना उत्सव आनंदाचा
मार्ग काढी प्रगतीचा
संघर्षाशी हात मैत्रीचा
स्वाभिमान सदा जपण्याचा
असे आवडता गृहिणींचा
आदर्श स्वयंपाकघरांच्या भिंतीचा
प्रचंड आहे इच्छाशक्तीचा
स्वयंशिस्त अंगी बानवण्याचा
अध्यात्माशी मैत्री याची
साथ देई सकारात्मकतेची
प्रा. सौ नलिनी लावरे.
