प्रेमांकुर
प्रेमांकुर


माझिया प्रियाशी सुर माझे
असे काही जुळले..!
पण माझिया मनाचे प्रेमनुर
तिला कधी न कळले..!!
विरहात तिच्या नकळत येतो
नयनातून अश्रूंचा ओघळ..!
कधी अवतरेल तिच्या रेशीम
मिठीत विसावण्याचे मृगजळ..!!
मजला बोचते तिच्या
अबोला दुराव्याचे शल्य..!
तरीही माझ्या मनी
असते तिचेच प्राबल्य..!!
कल्पनाही करवत नाही
मजला तिच्याविना जगणं..!
तिचा वियोग म्हणजे जणू
पाण्याविना मासोळीचं तडफडणं..!!
कशी समजावू माझी प्रीत
शब्दही झालेत आता मूक..!
कशी शमेल माझ्या अतृप्त
प्रेमभावनांची विलक्षण भूक..!!
कसा उपटू मी हृदयातील
तिचा गोजिरवाणा प्रेमांकुर..!
तिच्या अविवेकी वागण्याने
माझी स्वप्ने होतात चुर..!!
तिच्या प्रेमासाठी घालतो
तिच्या अवतीभोवती पिंगा.!
मी आता काय करू
तुम्हीच आता सांगा..!!
तिच्याच स्मृतींची साक्ष देतात
माझ्या हृदयातील स्पंदनं..!
दुःख, विरह व तडजोडीची
अभागी मूर्ती म्हणजे 'चंदन '..!!