कविताच कवी बनवते
कविताच कवी बनवते
मी कविता केली असे म्हणूनच
कवितेची किंमत कमी केली जाते
मात्र कविता करतांना कविताच
लिहिणाऱ्याला कवी बनवत असते
कविता करुन करुन कवीची खरी
वैचारीक प्रगल्भता वाढत असते
आणि तेव्हाच कवीची कविता
अधीकच समृद्ध झालेली दिसते
जेव्हा कवीची ती कविता समृद्ध
झालेली आम्हां दिसून येत असते
तेव्हाच खऱ्या अर्थाने कवी अन्
कवीचे मनही समृद्ध झालेले असते
कवीमन हे जसे निरागस बालक
जन्माला आलेले वाढत असते
त्याप्रमाणे कवीमन
नी कवीची
शैली देखील समृद्ध होतच जाते
कधी कधी कविता त्या स्पर्धेतील
यशामुळे सर्वांची वाहवा मिळवते
त्याच वेळी याचे सारे श्रेय कवी
मात्र आपल्या कडेच घेत असते
असे अनेक गुण कवीच्या मनाच्या
गाभाऱ्यातून पुढे सरकत असतात
परंतु मनाची कवाडे वेळीच बंद
न केल्याने ते सारेच निघून जातात
यामुळेच कवीच्या कवितेने जेव्हा
वरची पातळी कधी गाठलेली असते
तेव्हा मात्र कवीची कवितेच्या मानाने
वैचारीक पातळी न्यून्यतम् स्तरी राहते