आमची सावित्री देवी
आमची सावित्री देवी


आमच्या त्या सावित्री देवीला
कणव ती लेकींच्या शिक्षणाची
पण काही अतीशिष्ट लोकांना
भीती त्यांच्या त्या कमीपणाची
मुलींच्या शिक्षणात सावित्री देवीला
दगड अन् शेणाचे गोळे मारायचे
कारण त्यांचे दात खायचे वेगळे
अन् वेगळे होतेच खरे दाखवायचे
हे देवभोळ्या लोकांना फसवून
सांगत आरीष्ट्य तुमच्यावर येईल
जो कुणी चालीरीती रुढी परंपरांना
मोडून आपल्या मुलींना शिक्षण देईल
खरे उपकार केले आम्हावर त्या
थोर क्रांतीज्योती आणि ज्योतिबांने
स्वतः त्रास सहन करुनच मुलींना
खरे शिक्षण दिले त्यांनी हिंमतीने
त्या प्रतिकूल स्थितीवर मात करुन
मुलींच्या शिक्षणाचा प्रसार केला
म्हणूनच आज सर्व सौख्य लाभले
आहे पहा महिलांच्या या कर्तृत्वाला