जिजाईंची महती
जिजाईंची महती


जिजाई आमची आदर्श माता
होती शिव छत्रपतींची आई
वडील होते लखूजी जाधव
अन् माळसाबाई त्यांची आई
राजांच्या मदतीसाठी अंगी होते
स्त्री शक्तीचे प्रतिकात्मक गुण
खरी होती स्पूर्तीची ती मूर्ती नी
भोसले घराण्याची आदर्शच सून
गुणवान होती त्यांना आठ मुलं
पैकी सहा मुली आणि दोन बेटे
धाकटा मुलगा होता पराक्रमी त्या
शिवरायांचीच शत्रूला भिती वाटे
रामायण महाभारत त्यांनी सांगून
शिवरायांना खरे बालकडूच दिले
चारीत्र्य चातुर्य नी पराक्रम असे
राजनितीचे शिक्षणच त्यांना दिले
शिवराय जेव्हा मोहिमेवर जात तेव्हा
त्याच राजकारभार पाहत असत
आणि स्वाऱ्या लढाया यांचा सुद्धा
त्या योग्य तपशीलही ठेवत असत
सईबाईंच्या पश्चात त्यांनीच त्या
संभाजींचे पालन पोषण खरे केले
आणि खऱ्या वात्सल्य ममतेच्या
आदर्शाचे ते धडे जागापुढे ठेवले
अशा या जिजाई माई यांनी कवेत
घेतले होतेच सर्व गुणसंपन्नतेला
मात्र राजांच्या अभिषेका नंतर त्यांनी
बाराव्यादिवशी अखेरचा श्वास घेतला