हा आमचा शेतकरी राजा
हा आमचा शेतकरी राजा


आमचा शेतकरी राजा असूनही
त्यास दुःखी जीवन जगावे लागते
इतरजन मात्र त्यांनी दिलेले अन्न
सुखी समाधानाने ते खात असते
मानवतावाद जपणारे हेच पुढारी
हे सारे उघड्या डोळ्यांनी पाहती
आणि शेतकऱ्यांच्या समस्या दूर
करायला नेहमी भूल थापाच देती
मदतीला कुणी पुढे आला तर हेच
काही राजकारणी इथे खो घालती
आणि शेतकऱ्यांना ती मिळणारी
कमी अधीक मदत अडवून ठेवती
शेतकरी मेहनतीनेच शेती करुन
वरुण राजाची वाट पाहात असतो
मात्र त्याला लहरी पाऊसच कधी
दगा देऊन होत्याचे नव्हते करतो
या नैसर्गिक प्रकोपाने तो पूर्णपणे
हादरुन नी निराधार होऊन जातो
या वेळेल
ा मायबाप सरकार फक्त
आश्वासनांची खैरात करुन जातो
या आपत्तीत फक्त शेतकऱ्यांनीच
नुकसान सोसून आ करत बसावे
आणि इतरांच्या मदतीसाठी त्यांनी
डोळे लावूनच का हो पाहात राहावे
पाहा कोणतीही आपत्ती ती राष्ट्रीय
आपत्ती समजायला हवीच हवी
त्याकरीता लागणारे ते अनुदान
निधी वसुली सर्वांना सक्तीची हवी
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही
मदत कधीही उपकाराची नसावी
यात सर्व नोकरदार नी कमाईदार
यांचेकडून त्यांना हक्काची हवी
जर का हे असेच आपल्या देशात
नित्य नेमाने अखंड चालत राहील
तर हा राजा नक्कीच आनंदी राहून
सांगा तो आत्महत्या का हो करील