#सावली
#सावली
हरवलेली एक गोष्ट
काही केल्या सापडेना
विचारांचा काहूर डोक्यात
काही केलं थांबेना
असे काय आहे ते
येते माझ्या मागे
समोरून बघता काहीच
दिसत नाही कसे
कंटाळून शेवटी दुपारी
पडले बाहेर उन्हामध्ये
पडलेल्या सावलीला बघून
हळूच हसले गालामधे
प्रा.सौ. नलिनी लावरे
