संघर्ष*
संघर्ष*
*संघर्ष*
कुठे आहेस स्वातंत्र्या गरीबी भांडते आहे
निवारा शाल ना भाकर गुलामी वाढते आहे
ढगाला काय सांगू मी कहाणी भग्न स्वप्नांची
उन्हाच्या तापमानाने पऱ्हाटी पेटते आहे
उद्याला काम शोधूया जरासा हास ना बाबा
शहाणी पोर बाबाची उपाशी झोपते आहे
कुठे आहेस सिंड्रेला कुठे आहे तुझा राजा
कहाणी दोन स्वप्नांची खरी मज वाटते आहे
सखी आहे तुझी उंची कुबेराहूनही मोठी
कुटीमध्ये महालासारखी तू नांदते आहे
*पंकज कुमार उत्तम ठोंबरे*