STORYMIRROR

Sanjana Kamat

Crime

3  

Sanjana Kamat

Crime

उलगडा

उलगडा

1 min
239

उलगडली हव्यासी स्वप्ने रंगवलेली ,

स्वार्थापोटी मतलबी गिधाडे जमलेली.

वास्तव्यांच्या वणी राख पसरलेली,

कस्तुरीच्या हव्यासी पारधी टपलेली.


तुफान विस्तृतीचे झेलत अंधार वारा,

सुखदुःखाच्या प्रसंगी सावरत पसारा.

रक्तांच्या नात्यांचा उलगडला पारा,

समानहक्क लाटण्याचा दिसे कोहरा.


बालपण सरे नक्षत्रांच्या ऋणानुबंधात,

तोंडचा घास देत चाळीतून महालात.

मखमली तरंगी हितगुज खुलवीत,

दिड दमडीचा मैल चेहरा उलगडत.


बाबांची निव्रुतीवेतनी खोली हडपली,

बहिण व बाबांचा ठेवी स्वतःचीखोली.

वेगळी झालेली पाखरे वास्तुत घुसली,

चालते तिसरी जुगलबंदी हव्यासलेली.


सासऱ्याच्या संपत्तीत सून विराजमान,

रक्ताच्या नात्यांची चिरण्या बहुमान.

बहिणीचा हक्क लाटण्याचा धूर्त कावा,

उद्ध्वस्त रेशमी बंध शोधे मौलिक ठेवा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime