STORYMIRROR

RAHUL TITARMARE

Crime Others

4  

RAHUL TITARMARE

Crime Others

ताई तू जळताना आम्ही फक्त बघत होतो

ताई तू जळताना आम्ही फक्त बघत होतो

1 min
224

ती जळत होती, आम्ही बघत होतो

ती रडत होती, आम्ही बघत होतो

तिच्या किंकाळ्यातून अश्रुधारा निघताना, आम्ही त्या मोबाईलमध्ये भरत होतो

लाज नाही, ना शरम, गुंग आम्ही डिजिटली होतो


नराधम तो पळत असताना आम्ही त्याला बघत होतो

भर चौकात ताई तुला जळताना, आम्ही फक्त बघत होतो

निषेध मोर्चे अन व्हाट्सअप स्टेटस यातच आम्ही रमलो होतो

नराधम तिला जाळताना फक्त कॅमेऱ्यात आम्ही त्याला कैद करत होतो


आधी निर्भया, मग प्रियांका, आता अंकिता

अजून किती बहिणी मरणार याचंच चिंतन आम्ही करत होतो

फक्त न्यायव्यवस्था आणि शासन यांनाच दोषी आम्ही ठरवत होतो

जणू समाजातल्या अशा विकृतींना आम्हीच सारे पाळत होतो


ताई तू मरणाशी लढत असताना,

तुझी जात, तुझा धर्म हेच आम्ही शोधत होतो

नराधमांचे आम्ही साथी, बाजू जणू त्यांचीच मांडत होतो

मन विषन्न करणाऱ्या घटना होत असताना,

आम्ही फक्त मेसेज फॉरवर्ड फॉरवर्ड खेळत होतो

ताई तू जळताना आम्ही फक्त बघत होतो

ताई तू जळताना आम्ही फक्त बघत होतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime