येथे रोज घडते हाथसर
येथे रोज घडते हाथसर
येथे रोज घडते हाथसर
काहींना मिळतो न्याय
काहींचा होतो विसर
गुन्हाच ठरतो येथे
ती स्त्री असण्याचा
ती आक्रोश करते एकटी
आम्ही मात्र बेफिकर
तिची जात कोणती आहे
ठरवू नका आता तरी
कारण तुमची ही मुलगी चालत असते
रस्त्याने एकटीच भरभर
कित्येक दाबली प्रकरणे अशी
कित्येक हरवल्या पिडिता
द्या सुरक्षा आणि द्या बळ लढण्याचे
अन्यथा समाजकंटक जगतील आनंदाने
आणि पिडिता हरवत राहतील नाहीतर
