बाबा तुम्ही परतून येणार का?
बाबा तुम्ही परतून येणार का?
बाबा मी जेव्हा हसणार तेव्हा तुम्ही पण दाद द्यायला येणार का?
माझ्या चांगल्या गुणांवर पुन्हा शाबासकी मला देणार का?
रुसलेच मी कधी तर लाडोबा मला मंननार का?
सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का?
बघते रोज मैत्रीणाला बाबांसोबत त्यांच्या बोलतांना
बाबा माझे आसवे वाहतात तेव्हा
तुम्ही पुसण्यासाठी येणार का
सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का?
शब्द गोठू जातात माझे फोटो तुमचा बघताना
आठ
वणी असतात सोबती प्रवास जीवणानाचा करतांना
प्रवासात थोडी साद देण्यास तुम्ही येणार का
सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का?
लाडकी मी तुमची असेच का सोडून गेले मला
जाणिव होते तुमची ती परत तुम्ही पूर्ण करणार का
सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का?
आयुष्याच प्रवास अजून आहे खूप दूर
जाणिव नाही एकटे चालण्याची
तुम्ही परत माझे बोट पकडून चालवणार का
सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का?