STORYMIRROR

Adv Vishakha Samadhan Borkar

Inspirational Children

3  

Adv Vishakha Samadhan Borkar

Inspirational Children

न कळलेले बाबा

न कळलेले बाबा

2 mins
242

कधी तरी बाबाच्या मनाच्या कोपऱ्यात जाऊन पहा

त्या थककलेल्या चेहऱ्यावर प्रश्न दिसतील दहा

त्या थकलेल्या चेहऱ्याचे उत्तर तुम्ही शोधून दया

न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

ते वरुन वरुन दिसणारे रागीट बाबा

रागीट नसतात मुळीच!

ते शिकवत असतात जीवनाचे अनुभव

त्यांचे वात्सल्य म्हणजे अमृताची गोळीच!

ती गोळी वात्सल्याची कधी तरी चाखून घ्या

न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

पटकन रागावणारे बाबा दिसतात हो सर्वांना

कधी पाहिले का कोणी बाबांना रडताना

त्यांच्या ओरडल्यावर कधी तरी हसून घ्या

न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

त्या घरात कोण त्यांना समजत बरं

ज्याला त्याला आपलच वाटत खरं

ते अनुभवाचे पुस्तक कधी तरी वाचून घ्या

न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

ते सावली प्रेमाची, किती गार गार वारा

त्या चेहऱ्यावर एकांती असती आसवांच्या धारा

एकांती रडणाऱ्या मनाला, आयुष्याचा धीर दया

न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

कधी तरी ते उदास मन घेतले का जाणून

कधी तरी पहावं त्यांच्यासाठी जगून

हळूच कवटाळून त्यांना कुशित तुमच्या रडू दया

न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

ते न रडणारे मन रडून जाईल

आयुष्यभरच्या वेदनेवर शब्दांची फुंकर होईल

ती शब्दांची फुंकर कधी तरी मारुन घ्या

न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

ते असतात तोवर असते घराचे घरपण

त्यांच्या नसण्याने हरवते हिरवे बालपण

त्या हिरव्या सावलीत मुक्तपणे खेळून घ्या

न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

बाबा कळणे तसही नाही हो सोपं!

आपल्या भाकरीसाठी त्या डोळ्याला न झोप!

उचलुन थोडं भार त्या डोळ्यांना झोप दया

न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

आपल्या शब्दांचा नका करू किधीही प्रहार

थकलेल्या काळजावर असतो चिंतेचा भार

त्या चिंतेच्या भाराला कधितरी उतरवून दया

न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

थकले म्हणून काय झालं,लाज कसली त्यांची

लहानपणी ही बापमाऊली प्रेमाने घास भरवायची

असेल जरी थकेल अभिमानाने त्यांची ओळख दया

न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

मित्राच्या बाबाच्या कारीची का रे तुम्हा ओढ

पायी वहाण नसलेला बाप नाकारतात पोरं

त्या अनवाणी पायाची लाहिलाही कधी पाहून घ्या

न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

त्या अनवाणी पायाने तुला वहाण दिली

त्या उपकाराची ना कोणी किंमत केली

आयुष्य वेचनार्या बाबांला थोड आनंदच हसू दया

न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या...

***********************************


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational