प्रश्न तिच्या अस्तित्वाचा
प्रश्न तिच्या अस्तित्वाचा

1 min

294
प्रश्न तिच्या अस्तित्वाचा सदैव मनात सलतो
न माहेर तिचे न सासर हक्काचे
जिथे तिथे तिला समाज दूर दूर लोटतो
आपलीच माणसं ती नातीही काळजातील
मग का भाव आज मनामध्ये ठसतो
लहानपणी वाटे ओझं, नाही जगणे सुखाचे
मुलगी न होण्यासाठी वाटेल ते करतो
मुलगी प्रेमाची मूर्ती मुलगी वात्सल्याची छाया
त्य अनमोल प्रेमाला जग का विसरतो
मुलगी प्रतीक त्यागाचे नका देऊ तिला दुःख
ती आभाळमाया जिथे अथांग सागरही हरतो