Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Adv Vishakha Samadhan Borkar

Inspirational

3.7  

Adv Vishakha Samadhan Borkar

Inspirational

न तयात लोभ कुठले

न तयात लोभ कुठले

1 min
198


हाती येता मोबाईल मोठा 

जीवन कसे व्यस्त झाले 

कधी फेसबूक कधी व्हाट्सअप

तर कधी हाती इंस्टाग्राम आले 


सोशल मीडियावर आला पुर 

सगळेच जणू सेलिब्रिटी झाले 

नात्यांचे झाले वाटोळे 

नातेच केव्हाची क्वारंटाईन झाले 


सकाळ होता सगळ्यांची

गुड मॉर्निंगचे मेसेज आले

ही मॉर्निंग गुड करण्यासाठी

आपल्याच माणसाला विसरून गेले 


आहे हे पण विश्व छानच 

दूरचे पाखरू जवळ आले 

अनोळखी माणसासोबत जणू 

आपलेच म्हणून बोलू लागले 


पण हे जगत असताना 

आपण वास्तव विसरून जातोय 

माणूस न बोलताच निघून गेला 

शेवटचं बोलायचे राहून गेले 


भावना पळाल्या दूर आता 

देखाव्याचे मुखवटे आले 

वास्तवातून पडता-पडता 

आभासाचे चेहरे बनवले 


खरे जगणे हरवतोय माणूस

फक्त अस्तित्वासाठी लढतो आहे 

इतरांशी स्पर्धा करता-करता 

मनस्तापही पदरी आले


छान वाटतं कधी-कधी की

जग सगळे जवळ आले 

पण कळलेच नाही कधी

कसे नात्यांमध्ये वैर झाले 


थोडेसे सावरून पाहा

या आभासी जीवनाला 

मनात डोकावून पाहा

आपल्याच माणसाला 

मिळेल सर्व प्रश्नाचे उत्तर 

कळेल शिंपल्याच्या नादात

अनमोल मोती हरवून गेले 


छान वाटतात मोठे मोठे

मेसेजवर येणारे विचार 

आपणही त्याच्यावर कमेंट करतो 

पण खरं सांगायचं तर 

त्या फिलॉसॉफीमध्ये आयुष्य विसरून गेले 


त्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारं 

जगच खरंच जग नाही इतके भान असू दया

कधी कधी आई-वडिलांच्या

मनाच्या कोपऱ्यात जाऊन पाहा 

त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचे अंकुर

दिसतील तुम्हास कोमजलेले


मृगजळ झाले सुख जणू 

हृदयी काहूर मन अशांतले 

हृदयी लागता घाव दुःखाचे

ना तयास औषध कुठले 


जगता जगता जगतातच तर सगळे 

थोडे वेगळे जगून पाहूया ना 

असावी फक्त स्नेह आपुलकी 

न तयात लोभ कुठले


Rate this content
Log in