अनाथ
अनाथ
आईविन पोर मी
जगू आई मी कशी
आठवणीने वाहती अश्रू
अन भरते गं उशी....१
असं कसं रे देवा
आवडली तुला माझी आई
आईसारखी रे माया शोधून
या जगात मिळणार नाही ....२
एकदा का रे देवा माझ्या
आईशी भेट करशील का?
खूप दिवस झाले तिला पाहून
बघं देवा तुझं दार उघडशील का?३
तुझ्याविन आई नाही मी सुखात
आठवण तुझी जाळीत असते
रोज गं मनातल्या मनात
अनाथ पोर मज म्हणती जनात...४
