STORYMIRROR

Prashant Shinde

Tragedy

3  

Prashant Shinde

Tragedy

हतबल...!!

हतबल...!!

1 min
14.9K


असे प्रसंग येतात

एकाचे दोन होतात

दोनाचे चार होतात

हे कधी कळतच नाही


उद्या उद्या करत

पल्ला पार पडतो

स्टेशन आलेले पण

कधी समजत नाही


वाट काढत काढत

जीवन जगताना

वाट कधी सरत नाही

पण वळण चुकवण काही थांबत नाही


कधीतरी समज गैर समज

निर्माण होतात पण

कडू घोट औषध म्हणून

प्यावेच लागतात


आपल्या पिल्लांना

सुखरूप वाढविण्यासाठी

आईबापांना कधी कधी

काळ तोंड करायला लावतात


हतबल होतो बाप

तेंव्हा सर्वांनाच त्याचा ताप होतो

पण काय करणार तो बाप असतो

म्हणून तर त्याचा जीव तुटतो


इतकं नक्की पोरी

जग कितीही बदललं

तरी बाप कधीही

बदलत नाही


काचेच भांड त्याला

शेवट पर्यंत जपावच लागत

तेंव्हा कोठे त्याला

बाप होण्याचं समाधान लाभतं


हतबल झाला तरी

तो सार लपवून झिजत असतो

आणि आत कोठेतरी

सारख क्षणोक्षणी झुरत असतो


एकच इच्छा सदा उरासी

तो बाळगत असतो

दोनाचे चार करण्यासाठी

रात्रंदिन जागत असतो जगत असतो....!!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy