STORYMIRROR

Sanket Potphode

Romance Tragedy

4.4  

Sanket Potphode

Romance Tragedy

पहाट

पहाट

1 min
14.3K


पहाटे पहाटे मला जाग यावी

तुझ्या आठवांची मज साथ व्हावी,


व्हावी सकाळ तुझ्या कुशीत

घ्यावे मी तुला हलकेच मिठीत,


सारावेस दूर तू मला लाजून

पहात रहावे मी तुला हसून,


मग होई दिवस सुरू लटक्या रागाने

घ्यावे मी नमते मोठ्या आनंदाने,


का गेलीस तू दूर आज अचानक

भंगले माझे स्वप्न गोड अनामिक,


आता रात्र सरते तुझ्या आठवणीत

आणि पहाट येते घेऊन प्रश्न अगणित!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance