स्वप्नातल्या ह्या माझ्या भावना
स्वप्नातल्या ह्या माझ्या भावना
1 min
300
स्वप्नातल्या ह्या माझ्या भावना
सांग तू सत्यात उतरवशील का?
अंधाऱ्या ह्या माझ्या रात्रीत
सांग तू सूर्य बनशील का?
मान्य साऱ्या जगताची कहाणी
पण का तू त्यात गुरफटतेस गं?
लोकांचा त्या विचार करून
का तू आतल्या आत झुरतेस गं?
नसेन मी स्वप्नांतला राजकुमार
पण असशील तू माझी राणी गं
नाही देऊ शकत तुला मी महाल
पण श्रीमंत असेल आपली कहाणी गं
नक्कीच येतील संकटे अनेक
मी नाही म्हणत सोप्पे असेल
पण तू कधीही एकटी नसशील
साथ माझी पावलोपावली असेल
मग सांग तुझ्या मनातले
साथ माझी देशील का?
अडखळत्या माझ्या स्वप्नांचे
पंख तू बनशील का?
