सावळा हरी
सावळा हरी
1 min
508
सावळा गं हरी माझा
कान्हा तो कृपाळा
खोड्या काढून क्रीडा करी
जमवुनी गोपाळा
गोपिकांना तो ताल धरवी
वाजवुनी पावा
नंद यशोदेच्या घरी
आला नंदलाला
बालरूपी लीला केल्या
हरवुनी कंसाला
गोप गोपी हरखुनी गेले
पाहुनी कालियामर्दनाला
नवयुगाचेच जणू सारथ्य केले
पांचजन्य वाजवुनी
जीवनाचेच जणू रहस्य उलगडले
भगवद्गीता सांगुनी
सावळा गं हरी माझा
कान्हा तो कृपाळा
खोड्या काढून क्रीडा करी
जमवुनी गोपाळा
