वाटेवरुनी परतीच्या
वाटेवरुनी परतीच्या
वाटेवरुनी परतीच्या मी आजही धावतो आहे
खाचखळग्यातून तर कधी ठेचकाळून मी अखंड हा चालतो आहे,
कधी अकस्मित कधी अचानक भेट ही आजवर होत आली
आज ठरवुनी चालत आहे तर भेट बघू पुन्हा विस्तीर्ण नभाखाली,
तव प्रितीची ही नवशलाका माझ्या आसमंती लकाकत आहे
सतत तिजला लकाकण्यासाठी सूर्य हा आज माझा मावळतो आहे,
कधी दिवस कधी रात्र ही तर जगाची रीतच आहे
परंतु भर दुपारी सूर्य मावळतोय ही तर माझी तुझ्यावरची प्रीतच आहे,
आता तरी येशील का सांग मजला भेटशील का
काळोख्या ह्या भर दुपारी सांग तू मजला पाहशील का,
वाटेवरुनी परतीच्या मी आजही हा धावतो आहे
दमूनी क्षणभर थांबलो जरी वाट मी तुझीच पाहतो आहे,
