विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
1 min
1.3K
पंढरीचे स्नान । चंद्रभागे तिरी।
करिती दूर । पापे जनाची ।।
मारिली डुबकी । रोखला श्वास ।
जन्माची पापे । धुवूनी निघाली ।।
शारीरिक शुद्धी । करे चंद्रभागा ।
मनाची शुद्धी । राहुनी गेली ।।
मनाची शुद्धी । करे पांडुरंग ।
विटेवर उभा । हरी माझा ।।
माऊली माझी । जागी रात्रंदिनी।
आषाढीच्या दिनी । वेगळे काय ।।
वर्षभर थांबणेची । गरजच नाही ।
ओळख संकेत । विठू माऊलीचे ।।
मनी सदैव । भक्तीची चंद्रभागा ।
नामात डुंब । विठ्ठल विठ्ठल ।।
