कधी कधी वाटतं
कधी कधी वाटतं
कधी कधी वाटतं
हे असंच रहावं
असंच कधीतरी हे भेटणं
गप्पांत हे दिलखुलास हसणं
कधी कधी वाटतं, हे असंच रहावं
अगदी सुटसुटीत, मनमोकळं
कुठल्याच बंधनात नसणारं
कोणाच्याच नजरेत न येणारं
फक्त माझ्याच मनात खुलणारं
कधी कधी वाटतं, हे असंच रहावं
कसलीच चिंता नाही
ना कुठलीच अपेक्षा
नाहीत ते रुसवे फुगवे
आणि नाही ती मनधरणी
कधी कधी वाटतं, हे असंच रहावं
पण कधीतरी वाटतं
की असावं कोणीतरी
वेळेला मला साथ देणारं
तर कधी आसवं पुसणारं
कधी कधी वाटतं, हे असंच रहावं
कळतंच नाही कधीकधी
काय खरं, काय खोटं
काय बरोबर आणि काय चूक
भीती एकाच गोष्टीची वाटते
की कधी कधीच वाटतं, हे असंच रहावं
