सहज एकदा
सहज एकदा
1 min
477
सहज एकदा जाता जाता
वळून मागे पहावं म्हटलं
कोरड्या त्या जखमेला डिवचून
ओली पुन्हा करावं म्हटलं
उंच झोका झुलता झुलता
क्षणभर थांबून बघावं म्हटलं
खवळलेल्या समुद्रात नाव रेटून
शांत पुन्हा जगावं म्हटलं
कोसळत्या सरी पाहता पाहता
चिंब मनसोक्त भिजावं म्हटलं
बाहेरून हसऱ्या चेहऱ्याला झुगारून
हमसून पुन्हा रडावं म्हटलं
हमसून पुन्हा रडता रडता
उंच झोका झुलावं म्हटलं
तसंच मागे वळून पाहुन
परत पुढे निघावं म्हटलं
