सुगंध
सुगंध
तुझ्याच ह्या विरहाचा सारा
खेळ माझ्या अंतरी चाले
आपुल्या प्रेमाचा ध्रुवतारा
माझ्या मनी कायम राहे
ओल्या या आसवांतून माझ्या
सुगंध अपुल्या भेटीचा दरवळे
सुन्या ह्या आसमंती माझ्या
तुझ्याच आठवणींचे तुषार ओले
अश्याच या आठवणींत साऱ्या
मी हा असाच फिरतो आहे
न वाटे एकटे आता
तुझीच सोबत चांदण्यांत राहे
कोरड्या ह्या हृदयी माझ्या
तुझ्याच प्रीतीचा झरा नित्य वाहे
सुन्या ह्या अंतरी माझ्या
तुझीच प्रतिमा कायम आहे