तुला असे पाहता सखे
तुला असे पाहता सखे
तुला असे पाहता सखे
अंगावर हा शहारा आला,
जणू भटकलेल्या ह्या जहाजाला
तुझ्या किनाऱ्याचा सहारा झाला,
भेटून तुला आता सखे
मला स्वर्गाचाच भास झाला
अमावस्येच्या ह्या काळ्या रात्री
पूर्ण चंद्राचाच आभास झाला
हात हाती घेतला सखे
सारीच दुःखे पार झाली
मनाच्या ह्या माझ्या राऊळी
तुझीच भक्ती अपार झाली
एकच मागणे आता सखे
खेळ हा मोडू नकोस
कितीही काहीही झालं तरी
हा हात तू सोडू नकोस

