STORYMIRROR

Suyog Potdar

Tragedy

3  

Suyog Potdar

Tragedy

पाऊस

पाऊस

1 min
14.5K


आला सोसाट्याचा वारा,

घेऊन पाऊस आणि गारा

गरीब पोर तो बिचारा,

कुठे घेईल तो निवारा


पाऊस आम्हासी गंमत

FB Insta वर Update,

त्याची पोटासाठी धडपड,

तया वाटे हे संकट


इंद्रधनू आकाशी,

हर्ष झाला या मनासी,

तिथे पोर ते उपाशी,

कळले नाही हे कुणासी


लागली गाणी गारव्याची

पाऊस भजी कांद्याची

फजिती झाली गरिबाची

वेळ नासली धंद्याची


पाऊस श्रीमंता आकर्षण,

पाऊस गरिबा उपोषण

सरी लागता पावसाची,

मदत करा रे गरिबाची


कुणा देऊ जुनी छत्री,

कुणा खावया भाकरी,

कुणा देऊ जुनी कपडी

कुणा देऊ बांधून झोपडी


जे करता येईल ते करून,

फेडूया जरा समाज ऋण,

थोडं दुसऱ्यासाठी ही जागूया,

यंदा, पावसाळा असा साजरा करूया



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy