STORYMIRROR

Suyog Potdar

Romance

3  

Suyog Potdar

Romance

एक अशी प्रेयसी हवी आहे

एक अशी प्रेयसी हवी आहे

1 min
26.1K


एक अशी प्रेयसी हवी आहे,

मिळेल का कधी?


दिसायला साधारण असली तरी चालेल,

पण मनाने अप्रतिम सुंदर असणारी.

जीन्स टॅाप मधे जी ग्लॅमरस दिसेल,

आणि नववारात पण शोभून दिसणारी.


मॅाडर्न, फॅशनेबल, डिस्कोत जाणारी असल्यास

हरकत नाही.

पण मंदीरात देखील नियमीत जात असायला हवी,

म्हणजे प्रॅाब्लेम नाही.


गरीब असली तरी चालेल,

फक्त पैशाची लालच नसावी.

श्रीमंत असेल तरी चालेल,

फक्त दौलतीची घमेण्ड नसावी.


खेड्यातली असली तरी चालेल,

पण शहरात वावरता यायला हवं.

शहरात वाढलेली असली तरी चालेले,

पण खेड्यात देखील रमता यायला हवं.


अगदि माधुरीसारखंच नाचता यायला हवं

असं काही नाही,

पण नीदान नाचण्याची आवड नक्की असावी,

म्हणजे प्रॅाब्लेम नाही.


अगदी श्रेया घोषाल सारखीच गावी

असही काही नाही,

पण नीदान गाणी ऐकण्याची आवड असावी,

म्हणजे प्रॅाब्लेम नाही.


प्रत्येक कलेत नीपूण, अॅालराऊन्डर असायला हवी

असं काही नाही,

पण प्रत्येक कलेबद्द्ल, आदर, अॅप्रेसीएशन असावं

म्हणजे प्रॅाब्लेम नाही.


ईंग्रजी येत असावी, एवढंच हवं,

नको उगाच ईंग्रजीत पीटर पीटर करणारी.

संस्कृत साठी पण आदर हवा,

मराठीसह इतर एक दोन भाषा बोलणारी


माझ्या मनात काय आहे मी सांगणार नाही,

पण तिनेच जाणून घ्यायला हवं.

ऐकमेकांच्या स्वभावाला दोष न देता,

प्रेमाने सांभाळून घ्यायला हवं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance